थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 29 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / कोल्हापूर जिल्हा / बातमी

कोल्हापूरात दाखल झाला तामिळनाडूचा हापूस आंबा

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
कोल्हापूरात दाखल झाला तामिळनाडूचा हापूस आंबा
कोल्‍हापूर : येथील शेती उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये तामिळनाडूवरुन हापूस आंबा दाखल झाला आहे. समितीमधील दस्‍तगीर बागवान यांच्‍या पेढीवर १२ नगाच्‍या ४० बॉक्‍सची आवक झाली आहे. लिलावामध्‍ये प्रसाद वळंजू यांनी २५०० रुपये दराने प्रतिबॉक्‍सची खरेदी केली. दरम्यान कोकणातून रोपे नेत तामिळनाडूत केलेला हापूस आंब्‍याचा प्रयोग यशस्‍वी झाला आहे.
सिंधूदूर्गचा देवगड आणि रत्‍नागिरीचा रत्‍नागिरी हापूस आंबा जगप्रसिध्‍द आहे. मात्र आता कोकणातून हापूस आंब्‍याची रोपे नेेवून परराज्‍यासह परदेशातही आंब्‍याच्‍या बागांची लागवड केली जात आहे. तामिळनाडूमध्‍येही अशाच पध्‍दतीने कोकणातून काही वर्षांपुर्वी हापूस आंब्‍याची रोपे नेवून लागवड केली होती. या प्रयोगाला यश आले असून आता तामिळनाडूतून प्रतिवर्षी ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्‍यांत हापूस आंब्‍याची आवक होते.
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.