बातमी कशी तयार होते
विशाल विटावरील बातम्या दोन प्रकारे येतात: स्थानिक पातळीवर गोळा केलेली माहिती, आणि सार्वजनिक स्रोतांमधून स्वयंचलित प्रणालीने निवडलेल्या घडामोडी. प्रत्येक बातमीवर प्रसिद्धीची तारीख, ठिकाण आणि विभाग दिला जातो. सर्व बातम्या विशाल विटा या नावाने प्रसिद्ध होतात.
स्वयंचलित प्रणाली व AI
काही बातम्यांसाठी आम्ही स्वयंचलित प्रणाली आणि AI साधने वापरतो — सार्वजनिक स्रोतांमधून घडामोडी शोधणे, मराठी मजकूर तयार करणे आणि बातमीचा ऑडिओ तयार करणे यासाठी. अशा बातम्या संपादकीय आढाव्यानंतर किंवा स्वयंचलितपणे प्रसिद्ध होऊ शकतात. त्यामध्ये चूक आढळल्यास ती खालील दुरुस्ती धोरणानुसार दुरुस्त केली जाते.
अचूकता
- घटनेचे ठिकाण, तारीख आणि संबंधित व्यक्ती/संस्था स्पष्टपणे देणे.
- अफवा किंवा पडताळणी न झालेली माहिती बातमी म्हणून न देणे.
- फोटो दुसऱ्या स्रोताकडून घेतल्यास शक्य तिथे त्याचे श्रेय देणे.
दुरुस्ती धोरण
बातमीत चूक आढळल्यास बातमीची लिंक आणि योग्य माहिती vishalvita@gmail.com वर किंवा +91 98234 72425 वर कळवा. माहिती तपासून बातमी दुरुस्त केली जाते आणि बातमीची "अद्ययावत" तारीख बदलते.
जाहिराती व नैतिकता
- जाहिराती बातम्यांपासून वेगळ्या दाखवल्या जातात आणि त्यावर प्रायोजित असे लिहिलेले असते.
- वाचकांच्या वैयक्तिक माहितीबद्दल आमचे गोपनीयता धोरण लागू होते.
प्रश्न किंवा तक्रारीसाठी संपर्क पान पहा.