थेट डिजिटल पोर्टल बुधवार, 28 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

कला अकादमीचा कोजागिरी महोत्सव उत्साहात संपन्न

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
कला अकादमीचा कोजागिरी महोत्सव उत्साहात संपन्न
विटा : कला, संगीत, नृत्य आणि अभिनयाचा बहारदार संगम असलेला कला अकादमी, विटा यांचा २३ वा कोजागिरी महोत्सव शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पंचकुला मंगल कार्यालयात उत्साही वातावरणात संपन्न झाला. विविध कलाविष्कारांनी रंगलेल्या या महोत्सवात रसिकांना मनोरंजनाची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळाली. महोत्सवाच्या आयोजनासाठी सहप्रायोजक म्हणून लाभलेले ऍडव्होकेट डॉ शीतलताई बाबर, सतीशआबा साळुंखे, मोहनशेठ बुधवाणी, वनिताताई शितोळे, सुजीत घाडगे, लक्ष्मण कदम, महादेव पवार, रजनीताई पवार आणि अमृतराव नाईक निंबाळकर यांनी नटराज पूजन, रंगमंच पूजन आणि दीप प्रज्वलन केले. त्यांच्या आर्थिक व प्रोत्साहनपर पाठबळामुळे कला अकादमीच्या सांस्कृतिक उपक्रमाला बळ मिळाले. कला आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाच्या यशात शंकरनाना मोहिते, प्रतापदादा सुतार, सुनील शेट्टी यांच्यासह सर्व सहप्रायोजकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अध्यक्षा डॉ. स्नेहा कदम यांनी केले. महोत्सवाची सुरुवात नटराज वंदनेने झाली. माऊली गायकवाड आणि डॉ. श्रद्धा पाडळकर यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या बहारदार नृत्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. विभावरी फिरमे, पल्लवी नाईक, पूजा निकम, डॉ. शशिकांत भिसे, नीलिमा तारळेकर, सोमनाथ चव्हाण, संभाजी पाटील, डॉ. हणमंत जाधव, दिलीप जाधव, डॉ. नीता देशपांडे, डॉ. सुशांत वलेकर, धनंजय बाबर आणि गजानन बाबर यांनी विविध लोकप्रिय गीतांचे बहारदार सादरीकरण केले. दिलखेचक गाणी, सुरेल आवाज आणि ठेका धरायला लावणाऱ्या संगीतामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मराठी मॅशअपमधील गीतांपासून ते अखेरीस सादर झालेल्या ‘जिंदगी’ या हिंदी मॅशअपपर्यंत कलाकारांनी रसिकांना सभागृहात खिळवून ठेवले. धुंद करणाऱ्या सुरांनी आणि तालबद्ध सादरीकरणाने रसिकांना अक्षरशः डोलायला लावले. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली. अभिनयाच्या सादरीकरणांनीही महोत्सवात विशेष रंगत आणली. डॉ. स्नेहा कदम आणि रफिक तांबोळी यांनी अभिनयातून साकारलेली ‘झुरळ जनसेवा पार्टी’ ही विनोदी कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. गजानन बाबर, शैला बाबर आणि विठ्ठल भागवत यांनी सादर केलेल्या ‘ज्योतिषाची गुगली’ या विनोदी सादरीकरणाने उपस्थितांना पोट धरून हसायला लावले. दुसरीकडे, डॉ. शशिकांत भिसे यांनी आपल्या प्रभावी अभिनयातून नटसम्राट गणपतराव बेलवलकर यांची भूमिका साकारत वातावरण गंभीर आणि भावपूर्ण केले. विनोदापासून भावनाप्रधान अभिनयापर्यंतच्या विविध छटांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मानाजी कदम यांनी केले. गाणी गात, प्रसंगानुरूप संवाद आणि डायलॉग सादर करत त्यांनी कार्यक्रमात उत्साह आणि सहजता कायम ठेवली. त्यांच्या बहारदार सूत्रसंचालनाला उपस्थित रसिकांनी मनमुराद दाद दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. विनिता धमके यांनी आभार मानले.
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.