थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 15 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

विट्यात राजे ग्रुपतर्फे आरोग्य शिबिर संपन्न

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
विट्यात राजे ग्रुपतर्फे आरोग्य शिबिर संपन्न
विटा : दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब, शेतकरी, विद्यार्थी आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात द्या, या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विटा शहरातील राजे ग्रुप नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विटा शहरातील नागरिकांनी सहभाग घेत आरोग्यसेवेचा लाभ घेतला. राजे ग्रुप नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर व शोभाकाकी बाबर यांच्या आशीर्वादाने, तसेच राजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून लेंगरे रोड, दत्तनगर येथे दरवर्षी भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवादरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबत विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात.
यंदा आमदार सुहास बाबर यांचा १३ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. खानापूर, आटपाडी व तासगाव परिसरात कमी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त डिजिटल फलक, वृत्तपत्रीय जाहिराती व पुष्पगुच्छांवर खर्च न करता गरजू नागरिकांना शक्य तितकी मदत करावी, असे आवाहन आमदार बाबर यांनी कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राजे ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये जन आरोग्य केंद्र, विटा यांच्या वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉक्टर मुजावर मॅडम व त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने दिवसभर सेवा देत गरजू व पात्र रुग्णांची आरोग्य तपासणी केली.

(सदरची बातमी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप जोशी यांनी संपादित केली आहे)
जाहिरात • Fisher (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.