थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 15 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

विट्यात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
विट्यात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा
विटा : भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ ए. पी. जे. अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील वाचनालय विटा येथे त्यांना अभिवादन करुन, 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला. डॉक्टर कलाम साहेब यांनी अतिशय गरीबीतून आणि कष्टाने आपले शिक्षण पूर्ण केले होते. एक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन म्हणून जगभरात त्यांची ओळख होती. भारताचे राष्ट्रपती म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. एवढ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा त्यांनी आपला साधेपणा, विनम्रता सोडली नव्हती. त्यानी आपल्या संपूर्ण आयुष्यात अफाट वाचन करून ज्ञानसाधना केली होती. विद्यार्थ्यांनी त्यांचे हे गुण आत्मसात केले पाहिजेत. असे प्रतिपादन विजय महीद यांनी या प्रसंगी बोलताना केले. ॲड. सुभाष पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. वाचनालयाच्या वाचन कक्षात झालेल्या अभिवादन सोहळ्यास लोक विद्यापीठाच्या प्राचार्या स्नेहल पवार, मुख्याध्यापक श्री कांबळे, मुख्याध्यापिका उज्ज्वला पाटील, मुख्याध्यापिका आनंदी पाटील, ऋतुजा बिसुरकर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथपाल माधुरी माने यांनी आभार मानले.

  (सदरची बातमी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप जोशी यांनी संपादित केली आहे)
जाहिरात • Pruthviraj Enterprises (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.