थेट डिजिटल पोर्टल मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

विट्यातील विवेकानंद नगरमध्ये भक्तीचा जागर !

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
विट्यातील विवेकानंद नगरमध्ये भक्तीचा जागर !
विटा : शहरातील विवेकानंदनगर परिसरात सलग तिसऱ्या वर्षी भक्तिमय वातावरणात दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. निलेश कोरे व त्यांच्या पत्नी सौ. महानंदा कोरे यांच्या हस्ते विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी दादा कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. दुर्गामातेच्या आगमनानिमित्त विवेकानंदनगर परिसरात उत्साहाला उधाण आले होते. देवीच्या स्वागतासाठी परिसरातील महिलांनी आकर्षक व मनमोहक रांगोळ्या साकारून परिसराचे सौंदर्य खुलवले होते. दुर्गामातेची मूर्ती परिसरात दाखल होताच भाविकांनी पुष्पवृष्टी करून देवीचे जल्लोषात स्वागत केले. ‘जय दुर्गामाता’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला! दुर्गामातेच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत देवीची मूर्ती आणि पवित्र ज्योत विशेष आकर्षण ठरली. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला, तर लहान मुलांनी वाजवलेल्या वाद्यांच्या निनादाने मिरवणुकीत चैतन्य निर्माण केले. देवीच्या जयघोषात आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. प्रतिष्ठापनेनंतर विधिवत आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. धार्मिक विधी, आकर्षक सजावट आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. सलग तिसऱ्या वर्षी सुरू असलेल्या या धार्मिक उपक्रमांतर्गत दररोज सकाळी व संध्याकाळी विविध जोडप्यांच्या हस्ते दुर्गामातेची पूजा करण्यात येत आहे. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या या उत्सवामुळे विवेकानंदनगर परिसरात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

(सदरची बातमी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप जोशी यांनी संपादित केली आहे)
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.