थेट डिजिटल पोर्टल मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

आमदार सुहास बाबर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
आमदार सुहास बाबर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघात दुष्काळाचे सावट गडद होत असताना वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्या पैशांतून गरजू कुटुंबांना मदत करा, असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी केले आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करत त्यांनी वाढदिवसाचे, फ्लेक्स आणि विविध कार्यक्रमांऐवजी सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन सहकारी आणि मतदारसंघातील नागरिकांना केले. पुढे बोलताना बाबर म्हणाले की, मतदारसंघातील जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा कायमच आपल्या पाठीशी आहेत. मात्र, सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वाढदिवस साजरा करणे योग्य वाटत नाही. त्यामुळे वाढदिवसानिमित्त डिजिटल बोर्ड लावणे, फ्लेक्स उभारणे किंवा विविध कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी हा खर्च गरजू नागरिकांच्या मदतीसाठी वापरावा.
आपल्याला मिळणाऱ्या मानधनातून वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतल्यास अनेक कुटुंबांना दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. वाढदिवसाच्या खर्चातून गरजूंच्या घरांना आधार मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणे, अपघातात कुटुंबातील सदस्य गमावलेल्या कुटुंबांना मदत करणे तसेच औषधोपचारांचा खर्च भागवता न येणाऱ्या रुग्णांना आर्थिक सहकार्य करणे, अशा उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाने आपल्या गावातील गरजू व्यक्ती किंवा कुटुंबांना मदत करावी, फ्लेक्स आणि कार्यक्रमांवर होणारा खर्च वाचवून तो सामाजिक कार्यासाठी वापरल्यास प्रत्येक गावात मदतीची मोठी चळवळ उभी राहू शकते. यातून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण होईल, असा विश्वास आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केला. माझ्यावर असलेले तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्यासोबत आहेत. मात्र, वाढदिवसाच्या जाहिराती देऊ नका, फ्लेक्स लावू नका आणि कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी आपल्या गावातील गरजूंना मदत करा," असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.

(सदरची बातमी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप जोशी यांनी संपादित केली आहे)
जाहिरात • vishalvivah (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.