थेट डिजिटल पोर्टल मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

विट्यातील विवेकानंदनगरात वीजतारांवर धोक्याची ‘वेल’!

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
विट्यातील विवेकानंदनगरात वीजतारांवर धोक्याची ‘वेल’!
विटा : येथील विवेकानंदनगर बसथांब्या जवळील वीज मंडळाच्या खांबावर मोठ्या प्रमाणात वेल चढली असून, वीजवाहिन्यांना वेढलेल्या या वेलीमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यातच नारळाच्या झाडाची मोठी फांदी वीजतारांवर लोंबकळत असून, वाऱ्याच्या झोतासोबत ती धोकादायक पद्धतीने हेलकावे खात असल्याचे चित्र दिसत आहे. विवेकानंदनगर परिसरात दाट लोकवस्ती असून बसथांब्याजवळ नागरिकांची सतत वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी वीजवाहिन्या, खांब आणि त्यावर वाढलेली वेल यांची वेळीच साफसफाई व देखभाल होणे अपेक्षित आहे. मात्र, संबंधित वीज मंडळाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. खांबावर वाढलेली वेल वीजवाहिन्यांच्या अगदी जवळ पोहोचली आहे. दुसरीकडे नारळाची फांदी तारेवर अडकून असल्याने जोरदार वारा, पाऊस आल्यावर फांदी तुटण्याची घटना घडल्यास वीजपुरवठ्यात बिघाड होण्याबरोबरच वीजप्रवाहामुळे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज मंडळाने केवळ बिघाड झाल्यानंतर दुरुस्ती करण्याऐवजी धोकादायक ठिकाणांची नियमित पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. या ठिकाणी तातडीने पाहणी करून वेल काढावी, वीजतारांवरील नारळाची फांदी हटवावी आणि परिसरातील धोकादायक वीजवाहिन्यांची आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ‘अपघाताची वाट पाहणार की आधीच उपाययोजना करणार?’ असा सवाल आता विवेकानंदनगरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
(सदरची बातमी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप जोशी यांनी संपादित केली आहे)
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.