सांगली जिल्हा
ऑडिओ उपलब्ध
"वाचन संस्कृतीतून समाज प्रगल्भ बनवूया" - ईश्वर रायण्णवर
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
सांगली : " वाचन संस्कृतीतून जीवनाच्या विविध क्षेत्रातील ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि समाजाच्या जाणिवांचा स्तर, अभिरुची आणि प्रगल्भता वाढेल " असे प्रतिपादन ख्यातनाम वक्ते ईश्वर रायण्णवर यांनी केले. सांगली जिल्हा परिषद मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव उपस्थित होते. पुस्तके विचार , भावना आणि ज्ञानाला अमरत्व देतात. आपल्या अस्तित्वाने हजारोंच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतात. वाचनातून साधला जाणारा ' मौनसंवाद ' चिंतनाला दिशा देतो, विचारांची प्रक्रिया गतिमान करतो, भावनांच्या चढ उतरात विवेक जागृत ठेवतो. भावना प्रभावीपणे आणि उत्कटतेने व्यक्त करताना वाचनातून निर्माण झालेली शब्दसंपदा उपयोगी ठरते. प्रेरणा देणारे साहित्य समाज बदलू शकते. समाजाचा स्तर उंचावण्यासाठी वाचन चळवळ तळागाळात रुजवायला हवी असे ईश्वर रायण्णवर सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी भाषा अधिकारी डॉ. विमल माने यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली आणि समाजमाध्यमांद्वारा मराठी वाचन कट्टा स्थापन करून त्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. सोमनाथ रसाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा एकात्मिक महिला व बालविकास अधिकारी यांनी वाचनसंस्कृती घराघरात रुजावी यासाठी केलेल्या प्रयोगातून प्रेरणा दिली. अध्यक्षीय मनोगतात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दैनंदिन वाचन आपल्या सवयीचा भाग बनावा, यातून वैयक्तिक आणि सामाजिक संवेदना जीवंत रहाव्यात अशी अपेक्षा प्रकट केली. सहाय्यक प्रशासन अधिकारी संतोष वीर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राथमिक शिक्षण अधिकारी नानाभाऊ हजारे , सहाय्यक प्रशासन अधिकारी सुनील माळी, कार्यकारी अभियंता प्रवीण तेली आणि जिल्हा परिषद सांगलीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ विमल माने यांनी केले.
(सदरची बातमी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप जोशी यांनी संपादित केली आहे)

अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.