थेट डिजिटल पोर्टल शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

'परिस प्रवास’ पुस्तकाचे शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्रकाशन

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
'परिस प्रवास’ पुस्तकाचे शरदचंद्रजी  पवार यांच्या हस्ते प्रकाशन
विटा : आपल्या कष्टाने, जिद्दीने आणि दूरदृष्टीने गलाई व्यवसायात वेगळी ओळख निर्माण करणारे, असंख्य गलाई बांधवांचे प्रेरणास्थान आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे ‘सुवर्णश्री’ स्व. प्रतापशेठ (दादा) साळुंखे यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘परिस प्रवास’ या पुस्तकाचे भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दादांच्या संघर्षमय आयुष्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि समाजासाठी केलेल्या कार्याचा मागोवा घेणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे त्यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. सामान्य परिस्थितीतून पुढे येत स्वतःच्या कष्टावर मोठे विश्व उभे करणाऱ्या स्व. प्रतापशेठ दादांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी राहिला आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी जिद्द, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळविता येते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. व्यवसायात यशस्वी होत असताना त्यांनी माणुसकीची नाळ कधी तुटू दिली नाही. आपल्या प्रगतीबरोबरच इतरांचीही प्रगती झाली पाहिजे, हा विचार त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता.
गलाई व्यवसायाच्या क्षेत्रात स्व. प्रतापशेठ दादा साळुंखे यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. गलाई व्यवसायाशी जोडलेल्या अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले, प्रोत्साहन दिले आणि अडचणीच्या काळात आधार दिला. त्यामुळेच गलाई बांधवांच्या मनात त्यांनी केवळ एक यशस्वी उद्योजक म्हणून नव्हे, तर आपुलकीचा माणूस आणि मार्गदर्शक म्हणून स्थान निर्माण केले. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना मिळालेली ‘सुवर्णश्री’ ही ओळख त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी ठरली. माणसे जोडण्याची कला आणि जोडलेली माणसे आयुष्यभर जपण्याची वृत्ती हे दादांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्वाचा पैलू होता. व्यवसायातील यशाबरोबरच सामाजिक बांधिलकी, गरजूंना मदत करण्याची भावना आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी असलेली तळमळ यामुळे त्यांचे कार्य व्यापक झाले. आपल्या अनुभवातून इतरांना पुढे जाण्याची प्रेरणा देणारे दादा अनेकांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान निर्माण करून गेले. गलाई व्यवसायाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही स्व. प्रतापशेठ दादांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला दादांनी आधार दिला.
‘परिस प्रवास’ हे पुस्तक म्हणजे केवळ एका व्यक्तीचे चरित्र नाही, तर संघर्षातून यशाकडे जाणाऱ्या प्रवासाची आणि माणुसकी जपणाऱ्या विचारांची कहाणी आहे. स्व. प्रतापशेठ दादांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, व्यवसायातील संघर्ष, त्यांनी घेतलेले निर्णय, गलाई क्षेत्रातील योगदान, सामाजिक कार्य आणि सहकार क्षेत्रातील वाटचाल या सर्वांचा परिचय या पुस्तकातून वाचकांना होणार आहे. स्व. प्रतापशेठ दादांच्या कार्याची ओळख केवळ त्यांच्या समकालीन पिढीपुरती मर्यादित न राहता पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या दृष्टीने ‘परिस प्रवास’ हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः गलाई व्यवसायात कार्यरत असणारे व्यावसायिक, नवउद्योजक, आणि तरुणांसाठी हा जीवनप्रवास मार्गदर्शक ठरणार आहे. स्वर्गीय प्रतापशेठ (दादा) साळुंखे यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ पासून ‘परिस प्रवास’ हे पुस्तक सर्व वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यांच्या स्मृती जपण्याबरोबरच त्यांनी आयुष्यभर जोपासलेले विचार, मूल्ये आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.
सदर कार्यक्रमास माजी मंत्री जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार रोहित पाटील, विजय पाटील, शंकर मोहिते, रमेश शिरतोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.