सांगली जिल्हा
ऑडिओ उपलब्ध
विट्यातील चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
विटा : शहर व परीसरातील तमाम अबालवृद्धांचे श्रद्धास्थान म्हणून मान्यता पावलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा करण्याचे नियोजन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे. श्री चौंडेश्वरी मंदिरातील या नवरीत्रोत्सवास तब्बल ५५ वर्षांची परंपरा असून याकामी चालु वर्षीच्या उत्सवासाठी श्री चौंडेश्वरी मंदिराचा कोपरा न कोपरा स्वच्छ करण्यात आला आहे. सालाबाबदप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे व मंदिर सजवण्याचे काम पुर्ण झाले आहे. रविवार दिनांक ११ आक्टोबर २०२६ रोजी मंदिरामध्ये विधीवत घटस्थापणा करुन शारदीय नवरात्रमहोत्सवाचा प्रारंभ केला जाणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज प्रातःकाळी अगदी पहाटे श्री देवीस अभ्यंग स्नान,अभिषेक करण्यात येतो व नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगात व स्वरुपात देवीची अत्यंत आकर्षक व मनमोहक पुजा बांधली जाते. या दररोज बांधल्या जाणाऱ्या देवीच्या विविध रुपांतील पुजेचे विटेकरांना व विशेषतःमहिला वर्गास खुप आकर्षण असते. दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात.
सकाळच्या सत्रात दररोजच्या दुर्गामाता दौंडचा समारोप श्री चौंडेश्वरी मंदिरात महाआरतीने केला जातो. यास शहरातील शेकडो भाविक उपस्थित असतात. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक विधी संपन्न होतात व सायंकाळी ठिक सात वाजता मंदिरात मोठ्या मंगलमय वातावरणात देवीची महाआरती संपन्न होते. या आरतीसाठी शहरातील हजारो महिला आपापल्या घरातूंन पंचारतीचे तबक हातात घेऊन मंदिरात येत असतात. हजारो महिलांच्या हातात असलेल्या निरंजनाच्या मंद दिव्याच्या प्रकाशात होत असलेली महाआरती मंदिरामध्ये भक्तिमय मंगल वातावरणाचा उच्च बिंदु साधत मंदिर व शहरात सकारात्मक उर्जा तयार करीत असते. नवरात्रोत्सवात भाविक व महिलांची प्रचंड गर्दी विचारीत घेऊन विटा पोलिस मंदिर व परीसरात चोख बंदेबस्त ठेऊन सहकार्य करीत असतात. विजयादशमी दिवशी घट उठवीणेचा मंगलविधी संपन्न करुन व आपट्याच्या पानांचे अर्थात सोन्याचे पूजन करुन नवरात्र उत्सवाची सांगता केली जाते. सदरची माहिती देवांग समाज ट्रस्टचे अध्यक्ष दत्ताभाऊ चोथे यांनी दिली.
(सदरची बातमी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप जोशी यांनी संपादित केली आहे)

अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.