थेट डिजिटल पोर्टल मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

ब्रह्माकुमारीज विद्यालयात 'वृद्धजन दिवस' साजरा

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
ब्रह्माकुमारीज विद्यालयात 'वृद्धजन दिवस' साजरा
विटा : येथील ब्रह्माकुमारीज विद्यालयामध्ये एक ऑक्टोबर रोजी 'वृद्धजन दिवस' साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. स्नेहा कदम उपस्थित होत्या त्यांनी शारीरिक व मानसिक दृष्ट्या आपले जीवन निरोगी कसे ठेवावे या संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य असा होता की वरिष्ठ, सम्माननीय व्यक्तीनी आपल्या जीवनामध्ये केलेली मेहनत किंवा कष्ट आणि त्यांच्या घेतलेल्या अनुभवांचा आपण आदर करावा व तसे समाज्यामध्ये त्यांना योग्य स्थान मिळावे , त्याच बरोबर कुटुंब- परिवारामध्ये राहत असताना भिन्न-भिन्न स्वभाव- संस्कारामुळे आपसात होणारे वाद विवाद, मतभेद, गैरसमज अश्या अनेक घटनांमध्ये आपण आपले मानसिक स्वास्थ्य कसे जपावे यासाठी राजयोगाचा अभ्यास करण्यात आला. राजयोग ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. याच्या नियमित अभ्यासाने आपण आपल्या अनियंत्रित भावनांना शांत करुन, आनंदी राहू शकतो. ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या संचालिका नंदा दीदी यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमास प्राध्यापक अंकुश निकम,
प्रविण दाते सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ईश्वरीय परिवाराच्या सहयोगाने कार्यक्रम संपन्न झाला.
जाहिरात • Rajlaxami Enterprises (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.