थेट डिजिटल पोर्टल शनिवार, 17 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

सामाजिक वनीकरण विभागातर्फे सांगली जिल्ह्यात 54 वनराई बंधाऱ्यांची उभारणी

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
सामाजिक वनीकरण विभागातर्फे सांगली जिल्ह्यात 54 वनराई बंधाऱ्यांची उभारणी
विटा : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभाग, सांगली यांच्यामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 54 वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली असल्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी प्रशांत वरूडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या मोहिमेंतर्गत आटपाडी तालुक्यात पिंपरी खुर्द येथे 8 व खरसुंडी येथे 2, असे एकूण 10, जत तालुक्यात कंठी येथे 3 तसेच जत व बिरनाळ येथे प्रत्येकी 1, असे एकूण 5 बंधारे, कडेगाव तालुक्यात शाळगाव येथे 13, खानापूर तालुक्यात कार्वे येथे 2 वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. पलूस तालुक्यात बांबवडे येथे 5, शिराळा तालुक्यात करमाळे, भाटवाडी येथे 2 आणि औंढी येथे 2, असे एकूण 5 बंधारे, तासगाव तालुक्यात तासगाव येथे 2, नागाव कवठे येथे 3, मतकुणकी येथे 2 व बस्तवडे येथे 1, असे एकूण 8 बंधारे, मिरज तालुक्यात एरंडोली येथे 4 व भोसे येथे 1, असे एकूण 5 बंधारे, तर वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर येथे 1 वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभागांतर्गत कार्यरत सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक तसेच विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

  (सदरची बातमी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप जोशी यांनी संपादित केली आहे)
जाहिरात • Adarsh (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.