गलाई बांधव
ऑडिओ उपलब्ध
राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत रणवीर राजेने पटकावले रौप्यपदक
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
कोल्हापूर : हरियाणातील करनाल येथे मिनर्व्हा पब्लिक स्कूलच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सीबीएसई राष्ट्रीय ज्युडो अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ मध्ये कोल्हापूरच्या विबग्योर हायस्कुलचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी रणवीर कैलास राजे याने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकाविले. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात रणवीरने हरियाणाच्या समर सिंग याचा अवघ्या २० सेकंदांत सेओई-नागे तंत्रावर इप्पोन गुणांनी पराभव करत विजयी सलामी दिली. त्यानंतर तमिळनाडूच्या प्रणव याच्यावर ओ-गोशी तंत्राचा प्रभावी वापर करून इप्पोन गुणांसह विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत पश्चिम बंगालच्या रासीन उमर याच्यावर पुन्हा एकदा सेओई-नागे तंत्राचा अचूक वापर करत इप्पोन गुणांनी विजय मिळवून त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थ चौधरी याच्याविरुद्ध रणवीरने चुरशीची झुंज दिली. मात्र, नेवाझा प्रकारात प्रतिस्पर्ध्याने इप्पोन गुण मिळवल्याने रणवीरला पराभव स्वीकारावा लागला. परिणामी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रणवीरच्या या यशामागे शाळेचे प्राचार्य प्रवीण शर्मा यांचे मार्गदर्शन, ज्युडो प्रशिक्षक संतोष बाबर यांचे मोलाचे प्रशिक्षण व सातत्यपूर्ण प्रोत्साहन तसेच क्रीडा शिक्षक विनायक साळोखे यांचे सहकार्य लाभले. रणवीरच्या या राष्ट्रीय यशाबद्दल त्याचे, त्याच्या पालकांचे तसेच विबग्योर हायस्कुलचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यातही त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. रणवीर हा कोल्हापुरस्थित गलाई बांधव वसंतराव राजे ( मूळ गाव रेणावी) यांचा नातू आहे.

अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.