दिल्लीतील CJP च्या आंदोलनादरम्यान प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारतात अघोषित आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची लवकर सुटका करावी, अशी मागणी त्यांनी केली. रविवारीपर्यंत सुटका न झाल्यास आमरण उपोषण किंवा पदयात्रा सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशारा वांगचुक यांनी दिला. शांततापूर्ण आंदोलन आणि लोकशाही अधिकारांचे संरक्षण करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.