सांगली जिल्हा
ऑडिओ उपलब्ध
लाचखोर मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
कडेगाव : हरकत नोंद सुनावणीचा निकाल बाजूने देऊन खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कडेगाव येथील मंडल अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित मंडल अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मनोहर धोंडिराम पाटील (वय ५०, राहणार किसाननगर, ईश्वरपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली) असे अटक करण्यात आलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे, तर राजेंद्र विष्णू पाटील (५२, राहणार लाड वस्ती, राजापूर, तालुका तासगाव) असे लाचेची मागणी करणाऱ्या खासगी व्यक्तीचे नाव आहे. तक्रारदाराच्या जमीन खरेदी दस्ताच्या नोंदीबाबत कडेगाव मंडल अधिकारी कार्यालयात हरकत नोंद सुनावणी सुरू होती. या प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देऊन नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी मनोहर पाटील याने पैशांची मागणी केली. कार्यालयात काम करणाऱ्या राजेंद्र पाटील या खासगी व्यक्तीला भेटून लाचेची रक्कम त्याच्याकडे देण्यास सांगण्यात आले होते. याबाबत तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.