थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

शेडगेवाडी परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
शेडगेवाडी परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद
शिराळा : तालुक्यातील शेडगेवाडी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून मुक्तसंचार करून ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जेरबंद करण्यात वन विभाग व पुणे येथील 'रेस्क्यू' टीमला यश आले. गेल्या काही दिवसांपासून शेडगेवाडीच्या मुख्य बाजारपेठेसह माध्यमिक विद्यालय, नागरी वस्त्या आणि परिसरातील शेतांमध्ये बिबट्याचा वावर सातत्याने आढळून येत होता. दिवसा तसेच रात्री बिबट्याच्या हालचाली दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. विशेषतः शाळकरी मुले, शेतमजूर, महिला आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. बिबट्याने परिसरातील कुत्रे, मांजरी आणि कोंबड्यांना भक्ष्य बनवल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्याचा वावर 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यांमध्येही कैद झाला होता. त्यामुळे बिबट्याला तातडीने पकडण्याची किंवा त्याचा बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी केली जात होती.
जाहिरात • Aczet (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.