थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

अल्पवयीन मतिमंद मुलीवर वारंवार बलात्कार

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
अल्पवयीन मतिमंद मुलीवर वारंवार बलात्कार
तासगाव : येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलीला, तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली. अज्ञात संशयिताने हे कृत्य केल्याचा मुलीच्या आईने आरोप केला आहे. तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडिता ही मतिमंद असल्याने घरी तिच्या नातेवाईकांसोबत राहते. एप्रिल महिन्यात पीडित मुलगी घरी असताना संशयिताने तिच्याशी ओळख निर्माण केली. यातून तिला घराच्या पाठीमागील बाजूस नेऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध करताच संशयिताने 'तुझ्या आईला मारून टाकेन', अशी धमकी दिली. त्यामुळे पीडितेने त्यावेळी अत्याचार सहन केला. मात्र यानंतर संशयिताने वारंवार पीडितेला घराच्या पाठीमागील बाजूस बोलावून घेऊन तिच्यावर अत्याचार केले. तसेच अनेक वेळेस पीडितेला दुचाकीवरून गावाबाहेरील रस्त्याने फिरायलाही नेले असल्याचे पीडितेने तिच्या आईला सांगितले. चार महिन्यांनंतर आता पीडितेच्या आईला हा प्रकार समजला. तिने तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास तासगाव पोलिस करीत आहेत. आरोपीला तत्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
जाहिरात • Fishcher (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.