थेट डिजिटल पोर्टल सोमवार, 19 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

नवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयात चैतन्य देवीचं दर्शन

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
नवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयात चैतन्य देवीचं दर्शन
विटा : येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयात नवरात्री निमित्ताने चैतन्य देवीचं दर्शन घडविण्यात आले. यामध्ये मुलींना देवीच्या रूपात सजवून त्यांची स्थापना केली होती. या देखाव्यात वैष्णवी देवी (जीवनातील स्वच्छता, शुद्धता याचे प्रतीक), सरस्वती देवी (ज्ञान जे मानवातील बौद्धिक क्षमता, अचूक निर्णय शक्ति याचे प्रतीक), लक्ष्मी देवी (धन किंवा समृद्धीचे प्रतीक) अशा चैतन्य देवींचा देखावा सादर करण्यात आला. नवरात्रीमध्ये ज्या नऊ दुर्गेची आपण दरवर्षी स्थापना, आराधना, पूजा करतो त्याच नऊ दुर्गा म्हणजेच मानवातील असणार्‍या सूक्ष्म मानसिक शक्तीचे प्रतीक आहेत. त्या मानसिक शक्ति घर, परिवार चालवताना, सामाजिक कार्य करत असताना येणार्‍या अनेक संकटांना सामोरे जात असताना आवश्यक आहेत. तसेच देवींचे अलंकार व शस्त्र हे विकृत स्वभाव, संस्कारांना बदलण्याचे मनोबलाचे प्रतीक आणि देवींची वाहने ही मानवाच्या अनियंत्रित इच्छा किंवा मनावरील नियंत्रणाचे प्रतीक मानले जातात. नवरात्रीचा मुख्य संदेश असा की, आपणही त्या देवीप्रमाणे जीवनातील वाईट, अनावश्यक सवयीं बदलून चांगल्या गुण, शक्तींना धारण करून योग्य पद्धतीने त्यांचा वापर करावा. नियमित राजयोगाचा अभ्यास करत असणार्‍या विट्यातील बंधू भगिनींनी नंदा दीदींच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपले योगदान दिले.
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.