जनरल
ऑडिओ उपलब्ध
चला प्रगत भारत एकजुटीने घडवूया!
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
काळोख पार चिरून आली, स्वातंत्र्याची ती सोनेरी पहाट, रक्तात सळसळते आजही, त्या क्रांतीची धगधगती लाट...
अभिमानाने उभा तिरंगा, श्वास मोकळा आकाशात घेतोय, प्रत्येक भारतीयाच्या उरातून, आज 'वंदे मातरम्' घुमतोय...
स्वतःचे सुखाचे घरटे सोडून, फासावर जे हसत गेले, आपल्या उद्याच्या हसऱ्या पहाटेसाठी, काळोखात जे विझून गेले...
त्यांच्याच पवित्र रक्ताने सिंचली, ही स्वतंत्र भारताची माती, त्यांच्याच त्यागावर जळतेय आजही, आपल्या अस्तित्वाची वाती...
केशरी सांगतो शौर्य आपुले, पांढरा देतो शांतीचा मंत्र,हिरव्यागार समृद्धीवरती, चाले आपल्या देशाचे तंत्र...
अशोकचक्राची ती गती निळी, प्रगतीचा नवा मार्ग दावते, विविधतेतल्या एकतेची, सारी जगाला ओळख सांगते...
नुसता पंधराव्या ऑगस्टपुरता, नको हा देशभक्तीचा देखावा, कणाकणांतून आणि श्वासाश्वासातून, तिरंगा हृदयात जपावा...
देशासाठी जगण्याची आता, प्रत्येकाने ही शपथ घेऊया, नव्या युगाचा प्रगत भारत, चला एकजुटीने घडवूया!

अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.