थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सातारा जिल्हा / बातमी

ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांवर डल्ला मारणारे अटकेत

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांवर डल्ला मारणारे अटकेत
सातारा : शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपुरवठ्याचा कणा असलेले महावितरणचे ट्रान्सफॉर्मर खांबावरून खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारांवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. तांब्याच्या तारांसाठी ट्रान्सफॉर्मर उद्ध्वस्त करणाऱ्या या टोळीने सातारा जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याचे तपासात समोर आले असून, एक-दोन नव्हे तर तब्बल 16 चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.सदर कारवाईत विशाल शरद पवार (वय 35, रा. तरडगाव, ता. फलटण), साहील ऊर्फ शक्तीमान ऊर्फ चुचन लेमन पवार (वय 22, रा. विटभट्टीजवळ, नीरा, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि अदित लेमन पवार (वय 25, मूळ रा. नीरा, सध्या रा. पवाराची निगडी, ता. जि. सातारा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 75 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांना बाजारात मोठी किंमत मिळत असल्याने टोळीने थेट ट्रान्सफॉर्मरलाच लक्ष्य केले होते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ट्रान्सफॉर्मर खांबावरून खाली पाडायचा आणि त्यातील तांब्याच्या तारा काढून पसार व्हायचे, अशी त्यांची कार्यपद्धती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित होऊन त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसांना या टोळीतील तिघे सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. सखोल चौकशीत आरोपींनी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची माहिती दिली. त्यांना अटक करून चार दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली. कोठडीतील चौकशीत आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांचा पट उलगडत गेला आणि पुसेगाव, खंडाळा, शिरवळ व लोणंद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 16 गुन्हे उघडकीस आले.
जाहिरात • Fishcher (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.