जनरल
ऑडिओ उपलब्ध
आतापर्यंतच्या ठळक बातम्या थोडक्यात !
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
१) पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीमध्ये आज (१३ जुलै) रोजी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना भरधाव ट्रकने चिरडले. जेजुरीतील महामार्गावर ही घटना घडली. सदर भीषण अपघातात नंदा पवार (वय ६०, रा. कवलापूर, ता. मिरज), माधवी राजाराम सलगरे (वय ५५, रा. मालगाव, ता. मिरज) आणि राजश्री शंकर भोसले (वय ५५, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जखमी महिलांना तातडीने जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
२) अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाहसोहळ्याला गालबोट लागले. स्वागतावेळी आपले नाव माईकवरून पुकारले नाही, या क्षुल्लक कारणावरून एका तलाठ्याने संतापाच्या भरात माईक हातातून हिसकावून तोच लोखंडी माईक एका तरुणाच्या डोक्यात घातल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात शिवाजी सखाराम हजारे या तलाठ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३) बीड जिल्ह्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या २४ तासांत आंबेजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन धक्कादायक घटना समोर आल्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर दुसरीकडे आंबेजोगाई बसस्थानकाजवळ एका शिक्षकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. नातेवाईकांनी ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
४) अयोध्या येथील राम जन्मभूमी मंदिरासाठी मिळालेल्या देणगीत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांवरून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारला नोटिस बजावली आहे. या प्रकरणी स्वतंत्र तसेच न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर उत्तर मागवण्यात आले आहे. तसेच कोर्टाने एसआयटीकडून चौकशीचा स्टेट्स रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच सीसीटीव्ही फुटेज देखील सेव्ह करून ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.
५) कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या एक महिन्याच्या चिमुकलीचे बारसे होण्यापूर्वीच तिच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजारामपुरी परिसरातील अस्मिता प्रतीक काटकर यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याचे समोर आले. मात्र, हा आत्महत्येचा प्रकार नसून हुंड्यासाठी छळ करून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप अस्मिताच्या माहेरच्यांनी केला आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.
६) गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरू आहे. बाजारातल्या तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-इराणमधला तणाव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये चढ-उतार होत आहेत. जळगाव सराफ बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा १ तोळ्याचा भाव १.४२ लाख तर १ किलो चांदीचा दर २.२२ लाख इतका नोंदवला गेला आहे. गेल्या सात दिवसांमध्ये सोन्याच्या दरात सुमारे ४०००, तर चांदीच्या दरात तब्बल १३,००० रुपयांची मोठी घसरण झाली आहे.
७) 'लक्ष्मीकांत-प्यारेलाल' या अजरामर संगीतकार जोडीतील प्यारेलाल यांच्या पत्नी सुनीला प्यारेलाल शर्मा यांचे 12 जुलै रोजी वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत शांतपणे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावरील एका भावनिक पोस्टद्वारे देण्यात आली असून, संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.
८) महाराष्ट्रात सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेत राज्यभर करण्यात आलेल्या पडताळणीनंतर मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. सरकारी माहितीनुसार, सुमारे ९२ लाख लाभार्थी योजनेतून कमी करण्यात आले असून, पडताळणीआधी लाभार्थ्यांची संख्या जवळपास २.२३ कोटी होती. आता या योजनेत १.५ कोटींपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. त्यांना दरमहा १५०० रुपये देण्यात येत आहेत.
९) थायलंडची राजधानी बँकॉक येथील एका बारमध्ये रविवारी रात्री भीषण आग लागली, ज्यात 27 जणांचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. थाई अधिकाऱ्यांच्या मते, विद्युत प्रणालीतील बिघाडामुळे ही आग लागली असावी. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे.

अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.