सांगली जिल्हा
ऑडिओ उपलब्ध
विठ्ठलराव साळुंखे यांना' व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार' प्रदान
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
सांगली : सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., चे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांना दै. लोकमतच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार' नुकताच प्रदान करण्यात आला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील तसेच सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते विठ्ठलराव साळुंखे यांनी हा मानाचा पुरस्कार स्विकारला.
सहकार क्षेत्रातील बदलांचा वेध घेत पारंपरिक बँकिंगबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणे, ग्राहकांना अधिक जलद व सुलभ सेवा उपलब्ध करून देणे आणि संस्थेच्या कामकाजात सातत्याने नवनवीन संकल्पना राबविण्यासाठी विठ्ठलराव साळुंखे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. बदलत्या काळानुसार मोबाईल बँकिंग, युपीआय क्यूआर कोड, डिजिटल व्यवहार, ग्राहक सेवा केंद्रांचा विस्तार तसेच विविध ग्राहकाभिमुख योजना राबविण्यावर त्यांनी भर दिला. ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना आधुनिक आर्थिक सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे शिवप्रताप मल्टीस्टेटने आपले सेवा क्षेत्र अधिक व्यापक केले आहे. ग्राहकांचा विश्वास कायम ठेवत आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार सेवा यावर भर देण्याची त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. बँकिंग क्षेत्रात वेगाने होणाऱ्या बदलांचा स्वीकार करून त्याचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली आहे. सदर सन्मानामुळे विठ्ठलराव साळुंखे यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर, सभासद, ग्राहक, हितचिंतक आणि कर्मचारी वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.