थेट डिजिटल पोर्टल बुधवार, 21 ऑक्टोबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

कार्वे औद्योगिक वसाहतीस पाईप लाईन गळतीपाठोपाठ उपसा बंदीचा फटका

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
कार्वे औद्योगिक वसाहतीस पाईप लाईन गळतीपाठोपाठ उपसा बंदीचा फटका
विटा : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विटा-कार्वे येथील एमआयडीसीतील उद्योगांना अगोदरच बाजारातील मंदी व इतर अनेक कारणांनी घरघर लागली असतानाच गेले दहा-बारा दिवस पाणी नसल्याने हे सर्व उद्योग कमालीच्या अडचणीत सापडले आहेत. याबाबत न्यु इंडिया टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी सांगितले की, कार्वे एमआयडीसीतील पाण्याची गरज पुर्ण करण्यासाठी २००६ मध्ये पलूस येथील यंशवंत सहकारी पाणी पुरवठा योजनेतून पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. सदरची मूळ यशवंत पाणी योजना शेती पाण्यासाठी असून त्या योजनेस वीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असल्याने योजनेतील पाईप्स वारंवार फुटण्याचे प्रकार गेल्या दोन तीन वर्षापासून खुप वाढले आहेत. सद्यस्थितीत पाईप लाईन फुटल्याने गेल्या दहा बारा दिवसांपासून कार्वे औद्योगिक क्षेत्राचा पाणी पुरवठा बंद झालेला आहे. यामुळे एमआयडीसीतील जे काही थोडेफार उद्योग सुरु आहेत त्यांना फार मोठे नुकसान सोसावे लागत आहे. टॅंकरचे पाणी विकत घेऊन उद्योग चालविणे या मंदीच्या काळात कमालीचे कठिण व नुकसानीचे ठरत आहे. हे कमी की काय म्हणून पाईप लाईन दुरुस्ती झाली अन् आता शासनआदेशाने पाणी उपसाबंदी आदेश लागू करण्यात आल्याने पुन्हा पाणी बंद आहे.
या सर्व परिस्थितीमुळे येथील उद्योजक हतबल झालेले असून अशा परिस्थितीत येणारे वर्षभर उद्योग कसे चालवायचे हा मोठा यक्षप्रश्न उद्योजकांसमोर निर्माण झाला आहे. एमआयडीसी व्यवस्थापनाच्या मनमानी धोरणांचा व कारभाराचाही फटका उद्योजकांना बसत आहे. एखाद्या उद्योजकाचा पाणी मिटर बंद पडला व त्या उद्योजकांने ते मीटर एमआयडीसीला कळवून त्वरीत बदलून घेतले तरी त्या उद्योजकांस गेल्या काही महिण्याचा पाणी वापर पाहूंन सरासरी बिल भरायला भाग पाडले जाते. मात्र १०/१५ दिवस पाणी बंद असताना उद्योजकांच्या नुकसानीची कसलीच दाद घेतली जात नसल्याने उद्योजकांना आपण एमआयडीसी परिसरात आपले उद्योग घातल्याचा पश्चाताप करण्याची वेळ येत आहे . सबब या सर्व परिस्थितीचा विचार करता एमआयडीसी व्यवस्थापनाने वीस वर्षे जुन्या झालेल्या योजनेचे नूतनीकरण करावे तसेच कार्वे औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणी योजना करुन भविष्यातील वाढत्या औद्योगिकरणाची पाणी मागणी पूर्ण करण्याचे नियोजन करावे अशी मागणी कार्वे एमआयडीसीतील उद्योजकांनी केली आहे.

(सदरची बातमी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप जोशी यांनी संपादित केली आहे)
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.