थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

अज्ञात चोरट्याने दागिने लांबवल्याचा प्रकार उघड

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
अज्ञात चोरट्याने दागिने लांबवल्याचा प्रकार उघड
तासगाव : तालुक्यातील गव्हाण येथे धान्याच्या डब्यात ठेवलेले ४ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रोहन लक्ष्मण गुरव (वय ३१, रा. गव्हाण, ता. तासगाव) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रोहन गुरव हे कुटुंबीयांसह गव्हाण येथे राहतात. १ ऑगस्ट रोजी त्यांच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर घरातील सोन्याचे दागिने धान्याच्या डब्यांमध्ये ठेवले होते. रक्षाबंधनानिमित्त २८ ऑगस्ट रोजी दागिने काढण्यासाठी पाहिले असता ते गायब असल्याचे दिसून आले. सर्वत्र शोध घेऊन आणि नातेवाईकांकडे चौकशी करूनही दागिने न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. २ ते २८ ऑगस्ट या कालावधीत अज्ञाताने घरात शिरून हे दागिने चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमालात २० ग्रॅम सोन्याचा नेकलेस, २५ ग्रॅमचे गंठन, ५ ग्रॅमचे मंगळसूत्र, १० ग्रॅमची चेन आणि अंगठी, फुले, बदाम अशा सोन्याच्या वस्तूंचा समावेश आहे. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात • Rajkumar Nikam (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.