जनरल
ऑडिओ उपलब्ध
आतापर्यंतच्या ठळक बातम्या थोडक्यात !
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
१) विठूनामाचा गजर, टाळ-मृदंगांचा नाद आणि अथांग जनसागर अशा भारावलेल्या वातावरणात काटेवाडी (ता. बारामती) येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पारंपरिक ‘मेंढ्यांचे गोल रिंगण’ अत्यंत भक्तीभावाने पार पडले. हा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा पाहण्यासाठी काटेवाडीसह राज्यभरातून आलेल्या हजारो वारकर्यांनी मोठी गर्दी केली होती. काटेवाडी बसस्थानक परिसरात पालखी आल्यानंतर ती रथात विराजमान केली. यानंतर या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेले मेंढ्यांचे भव्य रिंगण सुरू झाले. काटेवाडीतील मेंढ्यांच्या कळपाने माऊलींच्या रथाभोवती शिस्तीत धावत गोल प्रदक्षिणा घातली. मेंढ्या धावू लागताच उपस्थित जनसमुदायाने एकच विठूनामाचा जयघोष केला.
२) खटाव तालुक्याच्या वन परिमंडळातील पुसेगाव, विसापूर, डिस्कळ या क्षेत्रातील सर्व गावात वनविभागाच्या हद्दीत आणि इतरत्र ठिकाणीही वन विभागाच्यावतीने शिकार मुक्त अभियान राबवले जात आहे. त्यानुसार पुसेगाव परिमंडळमध्ये कोणत्याही वन्य प्राण्यांची शिकार होऊ नये म्हणून गोपनीय खबर्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. वनविभागाच्यावतीने रात्रगस्त सुरु आहे. अवैध शिकार करणार्यास व सहभागी आरोपींना 3 ते 7 वर्षे तुरुंगाची शिक्षा, 25 हजार ते 1 लाखापर्यत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
३) ‘रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंग सावळ्याच्या अंगणी’ या भक्तीगीताचा प्रत्यय देणारा सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत चांदोबाचा लिंब येथे काल गुरुवारी पार पडला. टाळ- मृदंगांंच्या गजरात विठ्ठल…विठ्ठल नामाच्या उद्घोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण काल तरडगावजवळ सायंकाळी 5 वाजता पार पडले. त्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दीड दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणंद येथून मार्गस्थ झाला.
४) सातारा जिल्ह्यातील चिंचणी येथील शेतकरी सुरेश सावंत यांनी शेतीसाठी 7.5 एचपीचा व्हर्टिकल पंप खरेदी केला होता. मात्र, अवघ्या चार महिन्यांत पंपामध्ये गंभीर बिघाड झाला. त्यांनी विक्रेत्याकडे वारंवार तक्रारी करून प्रत्यक्ष भेटी घेतल्या, तसेच लेखी निवेदनही दिले. तरीही त्यांना केवळ आश्वासने मिळाली आणि अखेरीस तक्रार मान्य करण्यास नकार देण्यात आला. शेवटी सावंत यांनी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (1915) वर अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीची तातडीने दखल घेतल्यानंतर संबंधित विक्रेत्याने सावंत यांच्या घरी येऊन पंपासाठी भरलेली संपूर्ण रक्कम परत केली.
५) पुण्यातील एका डॉक्टरनं तुकाराम मुंढेंचे आपण डॉक्टर असून आपली त्यांच्याशी ओळख आहे, त्यांच्याकडे काही काम असल्यास आपण करुन देऊ असा मेसेज व्हाटस ॲप ग्रुपवर टाकला होता. हा मेसेज टाकणं डॉक्टरला महागात पडलं आहे. या मेसेज प्रकरणी पुण्यातील डॉक्टरवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. हिमांशू अजवानी असं या 48 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६) पेपरफुटीमुळे पुन्हा घेण्यात आलेल्या 'नीट' परीक्षेचा निकाल काल गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. ३ मे रोजी झालेल्या मूळ परीक्षेत पेपर फुटीच्या आरोपांमुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर २१ जून २०२६ रोजी २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच शिफ्टमध्ये ही फेरपरीक्षा दिली होती. सदर परीक्षेत ७२० पैकी ७१५ गुणांचा सर्वोच्च स्कोअर पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पानशुल बन्सल यांनी संयुक्तपणे मिळवला आहे. ७०५ पेक्षा जास्त गुण मिळवणारे पहिले १७ टॉपर्स हे प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, तमिळनाडू आणि तेलंगणा अशा आठ राज्यांमधील आहेत.
७) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) 100 हून अधिक शास्त्रज्ञांनी गेल्या काही महिन्यांत तडकाफडक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे 'गगनयान'सारख्य महत्त्वाकांक्षी मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. हा 'ब्रेन ड्रेन' रोखण्यासाठी केंद्र सरकारची पळापळ सुरू झाली असून, नोकरी सोडण्याच्या आणि स्वेच्छानिवृत्त घेण्याच्या नियमांमध्ये तातडीने बदल करण्यात आले आहेत.
८) शिवसेना नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा, मनसेचे सरचिटणीस बाळासाहेब शेडगे यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक खलील रज्जुलाल शेख यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुलताना खलील शेख यांनी फिर्याद दिली आहे.
९) "भगवान श्रीकृष्ण हे मुस्लिम होते, ते पाच वेळा नमाज पठण करत होते," असे वादग्रस्त विधान करणारे मौलाना जर्जिस अन्सारी यांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला आहे. असे विधान करणाऱ्या मौलानाला आधी ठोकला पाहिजे, त्याचा पहिला डीएनए तपासला पाहिजे, त्यात तोसुद्धा हिंदूच असल्याचे आढळून येईल, असा दावा पडळकर यांनी केला आहे.

अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.