जनरल
ऑडिओ उपलब्ध
आतापर्यंतच्या ठळक बातम्या थोडक्यात !
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
१) शेतातील विहीर खोदकामातून निघालेल्या मुरूमाची वाहतूक व वापरासाठी परवानगी मिळावी म्हणून तक्रारदाराने उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांकडे अर्ज केला होता. अर्जानुसार स्थळ पाहणी करून तहसीलदारांना सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी मंडलाधिकाऱ्याने तक्रारदाराकडे एक लाखाची लाच मागितली. त्याअनुषंगाने पडताळणीअंती सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडलाधिकाऱ्यास अटक केली. त्याच्याविरुद्ध सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयकुमार माने (वय ५४) असे त्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे.
२) नीट’ परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. काल सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी २० जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे खासदार आणि नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
३) चार वर्षांत सोलापूर, धाराशिव व सातारा जिल्ह्यांतून ४० दुचाकी चोरणाऱ्या पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथील चोरट्याला सोलापूर शहर गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वसंत विहार येथून त्याने एक दुचाकी (एमएच १३, डीके ५५११) चोरली होती. त्या गुन्ह्याच्या तपासात तो सापडला आणि गेल्या सहा महिन्यांत त्याने १३ दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली. सत्यवान रामहरी भोसले (वय ३२) असे त्या चोरट्याचे नाव आहे.
४) आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान कोणत्याही राजकीय नेत्याला न देता, जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांना देण्यात यावा, अशी मागणी सत्यशोधक वारकरी महासंघाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
५) भारतातील महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प अडचणीत आल्याची माहिती समोर आली आहे. भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यामुळे १.१० लाख कोटी रुपयांच्या प्रकल्प तब्बल ४० हजार कोटींनी वाढणार असल्याची शक्यता आहे. यामुळे हा प्रकल्प सुरु होण्याआधीच बंद होण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
६) पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील मुंढवा रोडवरील आराध्या ज्वेलर्समध्ये 12 जुलैच्या मध्यरात्री धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाच्या मागील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. त्यानंतर लॉकर आणि दागिन्यांचे कपाट फोडून सुमारे 25 ते 30 तोळे सोने तसेच मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गुन्हे शाखा, श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
७) सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. यापूर्वी हा विक्रम शरद पवारांच्या नावे होता. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीला २ हजार ४३० दिवस पूर्ण झाले आहेत. तर, शरद पवारांची मुख्यमंत्रिपदाची एकूण कारकीर्द २ हजार ४१२ दिवसांची राहिली आहे.
८) संपूर्ण देशात दररोज ३० कोटी लिटर दुधाचे उत्पादन होते. यातील धक्कादायक विरोधाभास म्हणजे रोज होणारी दुधाची विक्री तब्बल ७० कोटी लिटर आहे. म्हणजेच हे जादाचे ४० कोटी लिटर दूध कुठून येते हा गंभीर प्रश्न आहे. ही सगळी किमया आहे दुधातील भेसळीची आणि बनावट दुधाची! दुधातील या भेसळीमुळे नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस नासत चालले आहे. यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.
९) महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम १५५चा गैरवापर केल्याप्रकरणी महसूल विभागाने आक्रमक पावले उचलून राज्यातील १५ महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर संबंधित उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या निलंबनाचा आदेश काढला असून, महसूल प्रशासनातील नियमबाह्य निर्णय आणि अधिकारांच्या गैरवापराविरोधात सरकारने कारवाईचे धोरण स्वीकारल्याचा थेट संदेश देण्यात आला आहे.

अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.