थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सातारा जिल्हा / बातमी

कास पठारावर फुलोत्सवाची चाहूल

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
कास पठारावर फुलोत्सवाची चाहूल
सातारा : जिल्ह्याचे नैसर्गिक वैभव असलेल्या कास पठारावर यंदाच्या फुलोत्सवाची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पठारावरील वातावरण अधिकच अल्हाददायक झाले असून, सध्या चवर फुलांचा बहर पहायला मिळत आहे. त्याचबरोबर विविध रंगांची छोटी-मोठी रानफुलेही उमलू लागल्याने कासचा निसर्ग पुन्हा एकदा विविध रंगछटांनी नटू लागला आहे. दरम्यान, रविवारी विकेंडला पर्यटकांची पठारावर गर्दी झाली होती. शनिवार-रविवार सलग सुट्टी आणि अल्हाददायक पाऊस यामुळे राज्याच्या विविध भागांतून पर्यटकांची पावले कास पठारावर पडू लागली आहेत. रिमझिम पाऊस, दाट धुके, थंडगार वारा आणि परिसरातील ओसंडून वाहणारे धबधबे यांचा मनमुराद आनंद पर्यटक लुटताना दिसत आहेत.
चवर फुलांच्या बहराने कास पठारावर फुलोत्सवाची अधिकृत चाहूल लागली असून, येत्या काही दिवसांत संपूर्ण पठार विविधरंगी रानफुलांनी बहरून पर्यटकांना अनोखी निसर्गसफर अनुभवायला मिळणार आहे. फुलोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि कास व्यवस्थापन समितीने पूर्वतयारीला वेग दिला आहे. पर्यटकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि समिती सदस्य नियोजनबद्ध काम करत आहेत. संपूर्ण पठारावर संरक्षक जाळी बसविण्याचे काम महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले असून, पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियोजन, मार्गदर्शन आणि सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. विशेषतः शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पर्यटकांचे नियोजन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
जाहिरात • Rajkumar Nikam (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.