सांगली जिल्हा
ऑडिओ उपलब्ध
मिठाईचे दुकान फोडणारे दोन सराईत चोरटे गजाआड
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
सांगली : येथील १०० फुटी रोडवर असणारे मिठाईचे दुकान फोडणाऱ्या दोन आंतरराज्यीय सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत गजाआड केले आहे. बाबाजान मेहबूबसाब सोनशी (वय २७, रा. जयानगर, धारवाड, कर्नाटक) आणि विनोद धुंडाप्पा किरगी (२६, रा. हौसाल्लापूर, धारवाड, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत. सदर कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील ४९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून, त्यांना पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास १०० फुटी रोडवरील एका मिठाईच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेची चोरी केली होती. याप्रकरणी योगेश सुरेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिस अंमलदार सुमित सूर्यवंशी आणि विनायक सुतार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित आरोपी मिरज रेल्वे स्टेशनजवळील ख्वाजा वस्ती परिसरात आले आहेत. पथकाने ख्वाजा वस्ती परिसरातील उर्दू शाळा क्र. २ जवळ सापळा रचला. तेथून संशयितरीत्या फिरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचा फरार साथीदार मंजुनाथ अर्जुन हुल्लूर (रा. धारवाड) याच्यासह मिळून सांगलीतील मिठाईचे दुकान फोडल्याची आणि चोरीतील पैसे आपापसात वाटून घेतल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी हे कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. या कारवाईमुळे सांगलीतील घरफोडीचा एक महत्त्वाचा गुन्हा उघडकीस आला असून, फरार आरोपी मंजुनाथ हुल्लूर याचा शोध पोलिस घेत
आहेत.

अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.