जनरल
ऑडिओ उपलब्ध
आतापर्यंतच्या ठळक बातम्या थोडक्यात !
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
१) सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर येथील अनेक पिढ्यांची परंपरा असणारा भावई उत्सव सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी पारंपारिक वेशात जोगणा-जोगणीची दौड पार पडली. यावेळी महादेव मंदिरातून दिवा काढण्याची परंपरा आहे. या दिव्यात गोम किडा निघाल्यावर यंदा पाऊस समाधानकारक असल्याचे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
२) वाशिम-पुसद मार्गावरील खंडाळा घाटात मंगळवारी दि. १४ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास धावत्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. चालक आणि वाहक यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ५० प्रवाशांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच बसने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
३) मुलांकडून सांभाळ होत नसल्याने सोलापूरच्या फौजदार चावडी पोलिस ठाण्यात नंदा शिंदे (वय ६८) यांच्या फिर्यादीवरून दोन्ही मुलांसह सुनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांचा एक मुलगा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एमआर) आहे, तर दुसरा पुण्यात चांगल्या नोकरी करत आहे. एक सून वकील आहे. दोन्ही मुलांनी आणि त्यांच्या पत्नींनी २०१५ पासून नंदा शिंदे व त्यांचे पती रमेश शिंदे यांचा छळ सुरू केला. त्यांनी वयोवृद्ध आई-वडिलांच्या राहण्याची, जेवणाची आणि आरोग्याची कोणतीही काळजी घेतली नाही. त्यांना वारंवार शिवीगाळ करून घराबाहेर काढले आणि त्यांच्या नावावरील घराचा स्वतः उपभोग घेतला. तसेच, १० जुलै रोजी फिर्यादी नंदा शिंदे स्वतःच्या घरी गेल्या असता, त्यांना पुन्हा घराबाहेर हाकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी त्यांची मुले अतुल व अनुप तसेच त्यांच्या पत्नी सुवर्णा व दीपाली यांच्याविरुद्ध ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण व कल्याण अधिनियम, २००७ मधील कलम २४ अन्वये गुन्हा दाखल केला.
४) इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात असलेल्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २५८ धावा केल्या आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने चार गडी गमावून हे लक्ष्य गाठले. कर्णधार शुभमन गिल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताने २५९ धावांचे लक्ष्य ४५.२ षटकांत पूर्ण केले. कर्णधार शुबमन गिलने अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या साथीने सामन्यात शानदार कामगिरी केली.
५) नाशिकमधील सावळा घाटात काल मंगळवारी सायंकाळी थरारक आणि भीषण अपघात झाला. घाटातील तीव्र उतारावर दोन ट्रकांच्या मध्ये कारचा चेंदामेंदा झाला. या विचित्र अपघातात कारमधील ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही ट्रकांच्या मध्ये सापडल्याने कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
६) केरळच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एका लोकप्रतिनिधीनं तुरुंगातच पदाची शपथ घेतली. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेचे भाजपा नगरसेवक आर. सुगथन यांनी वियायूर मध्यवर्ती तुरुंगात शपथ घेतली. तिरुवनंतपुरमचे महापौर व्ही. व्ही. राजेश यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, तुरुंगात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नगरसेवक आर. सुगथन सध्या केरळ समाजविघातक कृत्ये प्रतिबंधक कायद्या (KAAPA) अंतर्गत तुरुंगवासात आहेत.
७) शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक मोठी राजकीय घडामोड झालीय. काल मंगळवारी सकाळी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर काल रात्री शरद पवार गटाचे प्रमुख नेते जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झालेत. विशेष म्हणजे त्याच्या आधी अजित पवार गट राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे हेदेखील वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या भेटीमागील नेमकं कारण काय आहे. त्यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय.
८) काही दिवसांच्या युद्धविरामानंतर अमेरीका आणि इराणध्ये पुन्हा संघर्ष सुरु झालाय. होर्मुझचा जलमार्ग हा कळीचा मुद्दा बनलाय. होर्मुझच्या जलमार्गावर अमेरीकचे नियंत्रण असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. इतकच नाही तर होर्मुज ओलांडणाऱ्या जहाजांवर 20% शुल्क लावण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केलाय. इराणने त्याला तीव्र विरोध केलाय. अमेरिका नाही तर इराणच होर्मुजचा खरा रक्षक असल्याचं इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी म्हंटलेय.
९) भारतातील सर्वाधिक संपत्ती असलेल्या धार्मिक स्थळांमध्ये आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती मंदिराचे स्थान अग्रस्थानी आहे. मंदिर प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या देवस्थानची एकूण मालमत्ता तब्बल २. २६ लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये सोन्याचे प्रचंड साठे, बँकांमधील मुदत ठेवी आणि जमिनींचा समावेश होतो. मंदिराला दरवर्षी ५,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळतो, ज्यातील १५०० कोटी रुपये केवळ भाविकांच्या दानातून येतात. दरवर्षी सुमारे ३ कोटींहून अधिक लोक येथे दर्शनासाठी हजेरी लावतात.

अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.