थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

विश्वबंधुत्व महाअभियानांतर्गत रक्तदान शिबिर संपन्न

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
विश्वबंधुत्व  महाअभियानांतर्गत रक्तदान शिबिर संपन्न
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या समाजसेवा प्रभागाअंतर्गत रक्तदान शिबिराचे नुकतेचआयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीर राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या स्मृती दिनानिमित्त " विश्व बंधुत्व रक्तदान महा अभियान " या नावाने करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास (भैया) बाबर, डॉ. प्रताप काटकर, डॉ. मानाजी कदम, आनंदराव काका पाटील (मंगरूळ), डॉ. जे. एम. पवार, मनमंदिर बँकेचे व्यवस्थापक सुरेश पवार आणि ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या विटा शाखेच्या संचालिका नंदा दिदी यांच्या हस्ते करण्यात आले. शुभ भावनेने केलेले रक्तदान हे प्राणाची रक्षा करण्याबरोबर त्याच्या जीवनामध्ये आशा, प्रेम, व शुभ भावना निर्माण करते तसेच या रक्तदान सेवेचा उद्देश्य केवळ रक्त एकत्र करणे नसून समाज्यामध्ये मानवता, एकता, आणि करुणा सारख्या नैतिक मूल्यांना जागं करणे असा आहे. संस्थेतील नियमित राजयोगाचा अभ्यास करणार्‍या सर्व बंधूभगिनींनी आपल्या तन-मन-धनाचा सहयोग देत हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडले.
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.