थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

तरसाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
तरसाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू
जत : तालुक्यातील अंकले येथे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या ७५ वर्षीय वृद्धावर तरसाने अचानक हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यात माजी पोलीसपाटील बाबा ऊर्फ कोंडिबा पांडुरंग दुधाळ-पाटील यांचा मृत्यू झाला. डफळापूर-अंकले रस्त्यालगतच्या शेतात ही घटना घडली. कोंडिबा पाटील नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी शेतात होते. यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या तरसाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. तरसाने त्यांच्या मानेवर, मांडीवर तसेच हातावर हल्ला केल्याने पाटील गंभीर जखमी झाले. प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आरडाओरडीनंतर तरस पळून गेले. अंकले गाव व परिसरात काही दिवसांपासून तरसाचा वावर असल्याची चर्चा होती. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, आता तरसाने वृद्धावर थेट हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला.
जाहिरात • Adarsh Instruments (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.