थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / जनरल / बातमी

आतापर्यंतच्या ठळक बातम्या थोडक्यात !

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
आतापर्यंतच्या ठळक बातम्या थोडक्यात !
१) पाकिस्तानला मोठा धक्का देत बलुचिस्तानने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलंय. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका निवेदनानुसार 'रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान' या नावाने बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून जाहीर करण्यात आले आहे. एका व्हायरल पत्रात बलूचिस्तानच्या लष्कराने बलूचिस्तानमधील ८५ टक्के भागावर कब्जा केलाय. यासह त्यांनी देशाचा ध्वज, राष्ट्रगीत, नवीन चलन, आणि प्रशासन व्यवस्था लागू करण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय.

२) शासकीय काम करण्यासाठी शेतकऱ्याकडे २५ हजाराची लाच मागणाऱ्या विस्तार गटविकास अधिकारी संदीप मोरे यांना अटक करण्यात आलीय.अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यातील शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या संदीप मोरे यांचे नाव लाच घेण्याच्या प्रकरणात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

३) राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजासाठी आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. सरकार शेतकऱ्यांच्या साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीमधील वीज जोडणीचं जुने विजबिलं माफ करणार असल्याची घोषणा केली आहे. शेतीला पाणी देण्यासाठी साडेसात हॉर्स पॉवरचे जे मोटारपंप वापरले जातात त्यांना सध्या बिल येत नाही. मात्र यापूर्वीची जुनी बिलं अजूनही प्रत्येकाच्या नावाने खात्यात जमा आहेत. त्यामुळे शेतकरी दुसरं कुठलंही कनेक्शन घ्यायला गेला तर त्याला ते मिळत नाहीये. परंतु आता महायुती सरकारने ही ४८ हजार कोटी रुपयांची जुनी बिलं माफ करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्याची पाटी कोरी झाली आहे.

४) गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या घोडवानी गावात रात्रीच्या वेळेस बिबट्याने शिरकाव केला. एका शेडमध्ये झोपलेल्या तीन लोकांवर बिबट्या हल्ला करण्याच्या तयारीत असताना ‘नेक्टर’ नावाच्या जर्मन शेफर्डने त्याला अडवले. तिघांना वाचविण्यासाठी श्वानाने मोठा संघर्ष केला.नेक्टरने पूर्ण ताकदीनिशी बिबट्याचा मुकाबला केला. बिबट्याने जखमी केल्यानंतरही नेक्टर मागे हटला नाही. त्याने पुन्हा बिबट्यावर हल्ला चढवला आणि बिबट्याला पुढे येऊ दिले नाही. यामुळे कालांतराने बिबट्याला माघार घ्यावी लागली आणि जंगलाच्या दिशेने पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या जर्मन शेफर्डने शेवटी प्राण सोडला.

५) राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर 1500 रुपये पाठवले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे पैसे लवकरच बँक खात्यात जमा होतील, असे सांगितले जात होते. म्हणूनच लाभार्थी लाडक्या बहिणी रोज आपले बँक खाते तपासत होते. आता मात्र याच लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळाली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून 1500 रुपये पाठवले जात आहेत. लाडक्या बहिणींनी आपापले बँक खाते तपासावे असे आवाहन कऱण्यात आले आहे.

६) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध भावली धरण परिसरात पर्यटकांच्या कुटुंबावर झालेल्या अमानुष आणि थरारक हल्ला प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या टवाळखोर आरोपींना न्यायालयाने 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील एका आरोपीचा धावत्या गाडीला लटकून हल्ला करण्याचा आणि महामार्गावर पडल्याचा थरारक व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी तीन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळवणे गरजेचे आहे. तसेच पर्यटकांना शिट्ट्या मारणारे मुख्य टवाळखोर अद्याप फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. 

७) आजच्या ऑनलाईन युगातही डीमार्ट अनेक मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना जोराची टक्कर देत आहे. यामागील कारण स्पष्ट आहे येथे सामान अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध असते. या यशामागे डीमार्टचे सर्वेसर्वा राधाकिशन दमानी यांची मेहनत आहे. दमानी हे देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यांची संपत्ती १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, राधाकिशन दमानी यांनी फक्त १२वी पर्यंतच शिक्षण घेतले आहे. तरीही त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने आणि व्यावसायिक समजुतीच्या बळावर ते आज अब्जावधींच्या संपत्तीचे मालक आहेत.

८) सध्या ईडीची नोटीस किंवा पोलिसी कारवाईच्या धाकाने राजकीय नेत्यांकडून पक्ष सोडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अनेक नेते कोलांटउडी घेताना दिसत आहेत. अगदी पक्षात सुरुवातीपासून काम करणारे, नेतृत्वाच्या पाठी खंबीरपणे उभे असणारे नेतेही पक्ष सोडताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी मदन मित्रा यांनी पक्ष सोडला आहे. मित्रा यांची पत्नी अर्चना मित्रा आणि दोन मुलांना ईडीने नोटीस बजावली आहे. पुढच्या आठवड्यात त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. नगरपालिकेतील नियुक्ती घोटाळ्यात 250 कोटींची अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे मित्रा यांच्या पत्नीला नोटीस बजावण्यात आली आहे. मित्रा यांनी वरील कारणाने पक्ष सोडला त्याची पश्चिम बंगालमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

९) सोलापूर विमानतळावरून २८ जूनपासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी सोलापूरकरांनी केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्टार एअरलाइन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोलापूर ते मुंबई विमानसेवा तात्काळ सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कंपनीला विमानसेवा सुरू करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. या प्रयत्नांना यश आले असून स्टार एअरलाईन कंपनीने २ ऑगस्ट पासून सोलापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जाहिरात • Fishcher (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.