थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सांगली जिल्हा / बातमी

सुळकाई डोंगर परिसरात २५० रोपांचे वृक्षारोपण

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
सुळकाई डोंगर परिसरात २५० रोपांचे वृक्षारोपण
विटा : येथील विश्वात्मा सोशल असोसिएशनने पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत सुळकाई डोंगराच्या वन विभाग परिसरात २५० रोपांचे वृक्षारोपण केले. समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून संस्थेने आपले सामाजिक कर्तव्य बजावले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल, वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. याच भावनेतून विश्वात्मा सोशल असोसिएशन गेली २३ वर्षे सातत्याने पर्यावरण संवर्धनाचे कार्य विटा पंचक्रोशीत करत आहे. यावेळी उपस्थितांनी वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संकल्प केला. केवळ रोपे लावणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, भविष्यात ही रोपे मोठी झाडे होऊन परिसर अधिक हिरवाईने नटावा आणि येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ व निरोगी पर्यावरण मिळावे, हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमास अध्यक्ष डॉ. मानाजी कदम, डॉ. स्नेहा कदम, नितांत तांबडे, डॉ. रामचंद्र कुंभार, डॉ. स्वाती शिंदे-पवार इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती
विश्वात्मा संस्था पर्यावरण संरक्षण, आरोग्य, शिक्षण आणि लोककल्याणाच्या विविध क्षेत्रांत सातत्याने कार्य करत आली आहे. ‘आज लावलेले एक रोप म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली हिरवीगार भेट’ या भावनेतून झालेला हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठीही प्रेरणादायी ठरला. २५० रोपांच्या माध्यमातून सुळकाई डोंगर परिसरात निर्माण होणारा हा हिरवा ठेवा पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. विश्वात्मा असोसिएशनने आजवर सुळकाई डोंगर, रेवणगाव,भांबर्डे ,देवनगर, बलवडी, रामापूर, घोटी बुद्रुभिकवडी येथील दावल मलिक दर्गा परिसर, देवनगर साळशिंगे रस्ता, विटा येथील विविध ठिकाणे, अशा अनेक भागात वृक्षारोपण केले आहे. रेणावी घाटात पर्यावरण रक्षणाचे फलक लावले आहेत. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आणि शाळांना हिरवाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. विटा परिसरात बीजारोपण, फांद्या रोपण करून गेली २३ वर्षे निसर्गाच्या प्रती असलेली आपली मैत्री संस्थेचे सदस्य जोपासत आहेत.
जाहिरात • Aczet (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.