थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / सातारा जिल्हा / बातमी

सिद्धाली शहा ठरल्या जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
सिद्धाली शहा ठरल्या जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका
फलटण : अवघ्या २२ व्या वर्षी नगरसेविका म्हणून निवडून येत फलटणच्या सिद्धाली अनुप शहा यांनी उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. 'जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका' म्हणून त्यांच्या नावाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली असून, संस्थेच्यावतीने त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. या जागतिक नोंदीमुळे फलटणच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. फलटण नगरपालिका निवडणुकीत २१ डिसेंबर २०२५ रोजी सिद्धाली शहा यांनी वयाच्या २२ व्या वर्षी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत ही कामगिरी केली. त्यावेळी त्यांचे वय २१ वर्षे १० महिने पाच दिवस इतके होते. तरुण वयात सार्वजनिक जीवनात प्रवेश करून लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी स्वीकारण्याबरोबरच जागतिक विक्रमाच्या रूपाने त्यांच्या कार्याची दखल घेतली गेल्याने त्यांच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची दिलेली संधी, तसेच मतदारांनी दाखविलेला विश्वास यामुळेच हे शक्य झाल्याचे सिद्धाली शहा यांनी सांगितले.
जाहिरात • Vishal Vivah (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.