सांगली जिल्हा
ऑडिओ उपलब्ध
बेकायदेशीर विदेशी दारूचा साठा जप्त
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
जत : तालुक्यातील कुंभारी येथे नागज रस्त्यावरील न्यू अमोल हॉटेलनजीक जत पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीर विदेशी दारूचा साठा व वाहतूक करणारे वाहन जप्त केले. या कारवाईत एकूण अवैध दारूचा साठा व वाहन, असा ६ लाख ४५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार अभिजित तुकाराम यमगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय रंगनाथ जाधव (वय ५८, रा. कुंभारी) याच्याविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून १८० मि.लि.च्या विदेशी दारूच्या ३८४ बाटल्या, ६५० मि.लि.च्या ४८ बिअरच्या बाटल्या, ६२० मि.लि.च्या २४ बिअरच्या बाटल्या, ५०० मि.लि.च्या २१६ बिअरच्या बाटल्या आणि ५ लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन (क्र. एमएच १० ईक्यू-१५५६) जप्त केले. बेकायदेशीर व बिगरपरवाना दारूचा साठा बाळगून त्याची वाहतूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.