सांगली जिल्हा
ऑडिओ उपलब्ध
शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी पलूसमध्ये निदर्शने
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
पलूस : लोकशाहीप्रेमी जनसंघर्ष समितीच्यावतीने देशातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील उपोषणाला जाहीर पाठिंबा देत, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवारी पलूस येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. पुरोगामी चळवळीचे संघटक व ज्येष्ठ विचारवंत व्ही. वाय. पाटील, महामार्ग संघर्ष समितीचे नेते डॉ. अमोल पवार, डॉ. मीनाक्षी सावंत, डॉ. साधना पवार, विद्रोही संघटनेचे मारुती शिरतोडे, ज्येष्ठ नेते मानसिंग पाटील, पलूस नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते दिगंबर पाटील, गटनेते सुहास पुदाले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीश गोंदील, दादासाहेब पाटील, शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीचे ऍड. दीपक लाड, डॉ. बी. एन. पवार, नगरसेवक धनाजी कुंभार, समाजवादी प्रबोधिनीचे संघटक प्रा. आदम पठाण आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या मनोगतातून केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांवर टीका करत संविधानिक लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. तसेच सोनम वांगचुक यांच्या मागण्या तातडीने मान्य करून त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना वक्त्यांनी सांगितले की, देशातील शिक्षण व्यवस्थेत गंभीर त्रुटी निर्माण झाल्या असून नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सरकारने कठोर पावले उचलावीत आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.