थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / जनरल / बातमी

पाईपलाईन बदलताना सापडला तब्बल ९८ कोटींचा खजिना

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
पाईपलाईन बदलताना सापडला तब्बल ९८ कोटींचा खजिना
लंडन : बेल्जियममधून एक धक्कादायक आणि तितकीच रंजक घटना समोर आली आहे. गटार पाईपलाईन बदलण्याचं काम सुरू असताना मजुरांना जमिनीखाली तब्बल ९८ कोटींचा सोन्याचा खजिना सापडला. हा खजिना पाहून कामगारांसह स्थानिक प्रशासनालाही मोठा धक्का बसला. ही घटना बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंट-गिलिस-डेंडरमोंडे परिसरातील आहे. एका जुन्या रस्त्यावर गटार पाईपलाईन बदलण्याचं काम सुरू होतं. याच कामात १८ वर्षीय विद्यार्थी कोबे आपल्या सहकाऱ्यांसोबत मजुरी करत होता. खोदकाम सुरू असताना कोबेला जमिनीखाली काहीतरी चमकताना दिसलं. सुरुवातीला त्याला ते साधे एक युरोच्च नाणे असावं असं वाटलं. मात्र, जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्याला तिथे सोन्याच्या विटा आणि सोन्याची नाणी असल्याचं लक्षात आलं एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने पाहून घटनास्थळी उपस्थित सर्वच कामगार आश्चर्यचकित झाले. मिळालेला हा खजिना एका जुन्या आणि भव्य कोठीच्या खाली असलेल्या तळघराच्या भिंतीत लपवण्यात आला होता.
सोन्याची नाणी आणि क्रमांक असलेल्या सोन्याच्या विटा एका मोठ्या पिशवीत ठेवण्यात आल्या होत्या. ही कोठी १८९९ मध्ये प्रसिद्ध बीअर उत्पादक थियोफिलस वॅन एशे यांनी बांधली होती. याठिकाणी १९७० पर्यंत बीअर उत्पादनाचं काम सुरू होतं. आजही य जुन्या इमारतीच्या भिंती अस्तित्वात असून, एका संस्थेकडून या वास्तूच्या पुनर्विकासाचं काम सुरू आहे. याचदरम्यान हा ऐतिहासिक खजिना सापडला. जमिनीखाली एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी तातडीने परिसर सील केला. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण खजिना ब्रसेल्समधील सुरक्षित लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हे सोनं नेमकं कुठून आलं आणि ते इतकी वर्षे तिथे कोणी लपवून ठेवलं होतं, याचा तपास सुरू आहे. या खजिन्याचा संबंध एखाद्या जुन्या गुन्ह्याशी आहे का, याचाही तपास तपास यंत्रणांकडून केला जात आहे. हा खजिन सर्वप्रथम पाहणाऱ्या १८ वर्षीय कोबेचंही कौतुक होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्यानंतर त्याने ते लपवण्याऐवजी प्रशासनाच्या स्वाधीन करणं योग्य असल्याचं सांगितलं. त्यामुळे त्याला याबाबत काय बक्षीस मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.