थेट डिजिटल पोर्टल गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 विटा, सांगली • ३०°C
होम / जनरल / बातमी

आतापर्यंतच्या ठळक बातम्या थोडक्यात !

ही बातमी ऑडिओमध्ये ऐका

आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
ऑडिओ उपलब्ध
आतापर्यंतच्या ठळक बातम्या थोडक्यात !
१) पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी विषारी गावठी हातभट्टी दारू विक्री करणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नवसागरसह अन्य विषारी रसायने मिसळून तयार केलेली दारू विक्रीसाठी आणल्याप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नकीता रणधीर बिरे (वय ३५, रा. वारजे माळवाडी),छाया कचरावत आणि ऋतिक कचरावत (दोघेही रा. वारजे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

२) गणेशोत्सवाला अवघे दोन महिने शिल्लक असताना बाप्पाच्या आगमनाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. विविध ठिकाणच्या मूर्तीकारांच्या कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तींना अंतिम स्वरूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, यंदा कच्च्या मालासह रंग, सजावटीचे साहित्य, वाहतूक आणि मजुरीच्या वाढलेल्या खर्चामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत सरासरी २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गणेशभक्तांना बाप्पाच्या स्वागतासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

३) सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मोहोळमधील कोरवली गावात शेतकऱ्याच्या विहिरीत चक्क मगर आढळल्याची घटना समोर आली आहे. कोरवली गावातील संभाजी जमदाडे यांच्या शेतातील विहिरीत बुधवारी सायंकाळी मोठी मगर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विद्युत पंप बंद करण्यासाठी गेलेल्या संभाजी जमदाडे यांना विहिरीच्या कड्यावर मगर दिसली. त्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामस्थ आणि वनविभागाला माहिती दिली आहे. आज गुरुवारी सकाळी मगरीला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यासाठी वनविभागाकडून बचाव मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

४) पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यानं वाहनांचे नुकसान होत नाही, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. तसेच त्याबाबतचे एक उदाहरण दाखवून द्या, असे आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडच्या रायपूर ग्राहक मंच न्यायालयानं E20 बाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 'E20 पेट्रोल-सुसंगत' म्हणून खरेदी केलेल्या कारमध्ये वारंवार बिघाड होत होता. अखेरीस या प्रकरणात ग्राहकाला न्याय मिळाला.ग्राहक मंचानं कंपनीला तक्रारदाराचे सध्याचे वाहन परत घेण्याचे आणि त्याऐवजी त्याच मॉडेलचे नवीन E20-सुसंगत वाहन देण्याचे आदेश दिलेत.

५) केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएने कारवाई केली आहे. सिया गोयलच्या वडिलांचे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मसाल्याचे दुकान आहे. 'बीजी गोयल अँड कंपनी' या फर्मची तपासणी करुन हळद पावडर, तीळ व सोयाबीन चंकचे नमुने जप्त केली आहेत. ८ लाख रुपयांचा ४ हजार किलोचा साठा लेबलमधील त्रुटी व भेसळीच्या संशयावरुन माल जप्त करण्यात आलाय.

६) अयोध्येतील राम मंदिरातील लुटीमुळे दुखावलेल्या तमाम रामभक्तांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य भाजपचे उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीन महाना यांनी केले आहे. 'ज्यांची श्रद्धा खरी नव्हती, ज्यांनी शुद्ध भावनेने दान केले नव्हते, त्यांचे पैसे दानपेटीतून चोरीला गेले,' असे निर्लज्ज तर्कट महाना यांनी मांडले आहे. ज्यांनी काहीच दिले नाही, त्यांनाच चोरीची जास्त चिंता आहे. आतापर्यंत देशातील कुठल्या संस्थेत कधी चोऱ्या झाल्याच नाहीत का?' असा अजब सवाल त्यांनी केला. ट्रस्ट बरखास्तीची मागणीही चुकीची असल्याचे महाना म्हणालेत. महाना यांच्या या सदर वक्तव्यामुळे रामभक्तात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे.

७) खेळ जगात श्रेष्‍ठ का, याचा मूर्तिमंत दाखला देणारा विजय प्रत्‍यक्ष मैदानावर साकारत अर्जेंटिनाने नाट्यमय लढतीत इंग्‍लंडवर २-१ गोलने विजय मिळवत फिफा वर्ल्डकपच्‍या अंतिम फेरीत मुसंडी मारली. एकवेळ एक गोलने पिछाडीवर पडलेल्‍या अर्जेंटिनाला फर्नांडेझने सामन्‍याच्‍या ८५ व्‍या मिनिटाला १-१ अशी बरोबरी साधून दिली आणि तेथूनच सामन्‍याचा नूर बदलला. त्‍यानंतर स्‍टॉपेज टाईममधील दुसर्‍या मिनिटाला मार्टिनेझने स्‍वप्‍नवत गोल मारत अर्जेंटिनाला फायनलमध्‍ये जोरदार धडक मारून दिली.

८) लातूरमधून वैद्यकीय क्षेत्राला हदरवणारी घटना समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध एम.जे हॉस्पिटलचे संचालक, आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लातूरकडून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या महामार्गालगत त्यांची कार आढळली. त्या कारमध्ये त्यांनी गुंगीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तर आत्महत्येचं नेमकं कारण एमआयडीसी पोलीस तपासत आहेत.

९) महाराष्ट्र राज्याचे मुख्य खरीप पीक असलेल्या सोयाबीनवर यंदा अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटे आली असून, शेतकऱ्यांकडून उगवण क्षमतेच्या शेकडो तक्रारी येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत कृषी विभागाकडे ३६१५ तक्रारी आल्या असून, प्रयोगशाळांकडे पाठवलेले ५८१ नमुने अप्रमाणित निघाले आहेत. यामुळे ‘ॲक्शन मोड’वर आलेल्या कृषी विभागाने आतापर्यंत बियाणे कंपन्यांवर चार ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
जाहिरात • Vishal Vita (सविस्तर पाहण्यासाठी क्लिक करा)

अधिक छायाचित्रे

News Photo

ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!

स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.

स्थानिक व्यावसायिक जाहिराती (Local Ads)

सर्व जाहिराती पहा →
विशाल विटा ऑडिओ बुलेटिन
🔴 ऑडिओ बातमी सुरू आहे
0:00 0:00

ताज्या बातम्यांचे थेट अलर्ट्स मिळवा!

विटा व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी थेट आपल्या स्क्रीनवर मिळवण्यासाठी सूचना सुरू करा.