सांगली जिल्हा
ऑडिओ उपलब्ध
अचानक आग लागून बस जळून खाक
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
तासगाव : कवठेमहांकाळ रस्त्यावर मणेराजुरी ते बोरगावजवळ खासगी बसला अचानक आग लागून बस जळून खाक झाली. ही घटना रविवारी पहाटे घडली असल्याचे समजते. रविवारी सकाळी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खासगी बस (एम एच ०९, ई एम ८४४२) मणेराजुरीकडून कवठेमहांकाळच्या दिशेने जात होती. बस मणेराजुरी हद्दीतील कोड्याचे माळ येथे आली असता बसला अचानक आग लागली. रात्रीची वेळ अन् बसमध्ये दोनच प्रवासी होते. त्यामुळे बस चालकाला आगीसंबंधी कोणाशी संपर्क साधता आला नाही. त्यामुळे बस पूर्णतः जळून खाक झाली. राष्ट्रीय महामार्ग पोलिस घटनास्थळी भेट दिली व बसचे चालक - वाहकाकडून अपघाताबद्दल माहिती घेतली. बसच्या एसीमध्ये शॉर्टसर्किट होऊन बसला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.