सांगली जिल्हा
ऑडिओ उपलब्ध
वारंवार कॉल करून त्रास दिल्याने तरुणीची आत्महत्या
ही बातमी ऑडिओमध्ये ऐका
आवाज चालू करण्यासाठी प्ले बटण दाबा
पलूस : प्रेमासाठी वारंवार कॉल व मेसेज करून छळ केल्यामुळे १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पलूस तालुक्यातील सावंतपूर येथे २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ऋतुजा मारुती हलस्कर असे मृत तरुणीचे नाव आहे. अंकुर बबन सुतार (रा. सावंतपूर, ता. पलूस) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक केलेली नाही. मृत तरुणीचा भाऊ दिनेश मारुती हलस्कर (वय २४, रा. समर्थ कॉलनी, सावंतपूर) यांनी पलूस पोलिसांत फिर्याद दिली आहे. ऋतुजा कुटुंबीयांसमवेत सावंतपूर येथील समर्थ कॉलनीत राहत होती. १२ ऑगस्ट २०२६ ते २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपी अंकुर हा ऋतुजाला मोबाईलवरून वारंवार कॉल तसेच मेसेज करत होता. 'माझे तुझ्यावर प्रेम आहे, तूही माझ्यावर प्रेम कर,' अशाप्रकारे बोलून तो तिच्यावर दबाव आणत होता. सुमारे १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे ऋतुजाला मानसिक त्रास होत होता. शेवटी सदर त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अधिक छायाचित्रे
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.