कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पद्मावती देवीच्या मंदिरांत चोरी करणाऱ्या आरोपीला वेळापूर पोलिसांनी जलद गतीने तपास करून बेड्या ठोकल्या आहेत कासलिंगबापू शिंदे (रा. काटी ता. इंदापूर जि. पुणे) असे आरोपींचे नाव आहे. उजनी येथील पद्मावती मंदिरात 6 लाख 45 हजार रूपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होती. वेळापूर पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने हवा असणारा आरोपी वेळापूर पोलिसांना मिळून आला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींस कुर्डूवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही बातमी आवडली का? मित्रांना शेअर करा!
स्थानिक बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा.